पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५० आणि ४६ पैशांची कपात करण्यात आल्याचे मंगळवारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून जाहीर करण्यात आले. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमत 11 वर्षांच्या निचांकी पातळीवर जाऊन पोहचल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाच्या किमती आणि रुपयाचा डॉलरशी विनिमय दर यातील बदलांनुसार तेल कंपन्या दर पंधरवडय़ाला देशांतर्गत दरांत बदल करतात. यापूर्वी 31 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 58 पैसे तर डिझेलच्या दरात 25 पैशांची कपात करण्यात आली होती.