काही दिवसांपुर्वी इंधनाचे दर रोज वाढत असल्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर 11 ते 14 पैशांनी कमी झाले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये हे दर वेगवेगळे आहेत. मुंबईत पेट्रोल 11 पैसे तर चेन्नईत 12 पैशांनी कमी झालं आहे. दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर 76 रुपये 16 पैसे असून, डिझेलचा दर 67.68 पैसे आहे. 14 मे ते 29 मे दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले होते.

पेट्रोलप्रमाणे डिझेलच्या किंमतीतही कपात झाली आहे. डिझेलच्या किंमतीत 10 ते 14 पैशांची कपात झाली आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईत 10 पैशांची तर मुंबईत 14 पैशांची कपात झाली आहे.

गेल्या 21 दिवसांमध्ये दिल्लीत पेट्रोलची किंमत 1 रुपया 53 पैशांनी कमी झाली आहे. तर डिझलेच्या किंमतीत 1 रुपया 52 पैशांची कपात आहे. 1 जूनला दिल्लीत पेट्रोलची किंमत 78.29, मुंबईत 80.92, कोलकातामध्ये 86.10 आणि चेन्नईत 81.28 रुपये होती. त्याचप्रमाणे डिझेलची किंमत दिल्लीत 69.20, मुंबईत 71.75, कोलकातामध्ये 73.67 आणि चेन्नईत 73.06 रुपये होती.

सध्याचे दर –
पेट्रोल – मुंबई – 83.92 रुपये, दिल्ली – 76.16 रुपये, कोलकाता – 78.83, चेन्नई – 79.04
डिझेल- मुंबई – 71.99, दिल्ली – 67.68, कोलकाता – 70.23, चेन्नई – 71.44