इंधनाचे दर कमी होतील या आशेवर बसलेल्या सामान्य जनतेला पेट्रोलियम कंपनीने आजही ठेंगा दाखवला आहे. इंधन दरात आज पुन्हा वाढ झाली असून पेट्रोल लीटरमागे १५ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी महागले आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांची एक दिवस दरवाढीतून सुटका झाली होती. परंतु, गुरूवारी पुन्हा एकदा यात वाढ झाली आहे.
Petrol and Diesel prices in Delhi are Rs 84 per litre (increase by Rs 0.15) & Rs 75.45 per litre (increase by Rs 0.20), repectively. Petrol & Diesel prices in Mumbai are Rs 91.34 litre (increase by Rs 0.14) & Rs 80.10 (increase by Rs 0.21), respectively. pic.twitter.com/jSSCKuOupa
— ANI (@ANI) October 4, 2018
दिल्लीत आजचे पेट्रोल दर ८४ रूपये प्रति लीटर तर डिझेल ७५.४५ पैसे प्रति लीटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल ९१.३४ पैसे (प्रति लीटर वाढ ०.१४ पैसे वाढ) तर डिझेलचा दर ८०.१० पैसे (०.२१ पैसे वाढ) आहे.
दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांचा अजून जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हॅट आणि अन्य स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोलचे दर बदलत जातात. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किंमती वाढत असताना सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कर कमी केलेला नाही. ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने ही दरवाढ सुरु आहे. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 7:12 am