सर्वसामान्यांना सध्या इंधन दरवाढीचा प्रश्न सतावत असून रोज होत असलेली दरवाढ चिंतेचा विषय ठरत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 5 पैशांनी महागलं आहे. यासोबतच मुंबईत पेट्रोलने नव्वदी गाठली आहे. लवकरच पेट्रोलचे दर शंभरी गाठतील अशी भीती सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज झालेल्या इंधन दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.08 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर 78.58 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 82.72 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर 74.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. रविवारी पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol crosses 90 rs in mumbai
First published on: 24-09-2018 at 07:38 IST