News Flash

सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दर वाढ कायम

इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ

संग्रहित छायाचित्र

देशात एकीकडे करोनारुपी संकट वाढत असताना, दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आज (शनिवार) सलग चौदाव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.८८ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.६७ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर, मुंबईत आज पेट्रोल ८५.६८ रुपये प्रति लिटर व डिझेल ७६.१ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पुण्यात पेट्रोल ८५.४१ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.६९ रुपये प्रति लिटर आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८२.२७ रूपये प्रति लिटर आणि ७५.२९ रूपये झाले आहेत, कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८०.६२ रूपये प्रति लिटर आणि ७३.०७ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता गेल्या १४ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. तर, एकूण १४ दिवसांमध्ये पेट्रोल ७.६० रुपये व डिझेल ८.२८ रुपये प्रति लिटर वाढले आहे.

करोनाची स्थिती आणि थांबलेले अर्थचक्र लक्षात घेऊन मेपासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 8:55 am

Web Title: petrol diesel price hike continues for 14th day in a row msr 87
Next Stories
1 नियोजित वेळेपूर्वीच रिलायन्स कर्जमुक्त; मुकेश अंबानींची घोषणा
2 रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी
3 चीनची घुसखोरी नाहीच!
Just Now!
X