देशातील इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील १८ दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. आज मात्र पेट्रोलचे दर १२ ते १५ पैसे प्रति लिटरने तर डिझेलचे दर १५ ते १८ पैसे प्रती लिटरने वाढवण्यात आले आहेत. देशातील मुख्य मेट्रो शहरांमध्ये ही दरवाढ करण्यात आलीय.

राज्याच्या राजधानीमध्ये पेट्रोल आता ९०.५५ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहेत. तर मुंबईकरांना एका लिटर पेट्रोलसाठी ९६.९५ रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्येही पेट्रोलचे दर मंगळवारी १२ पैशांनी वाढले आहेत. चेन्नईत पेट्रोलचा दर लिटरमागे ९२.५५ रुपये इतका आहे. नुकतीच निवडणूक झालेल्या पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी ९०.७६ रुपये मोजावे लागत आहेत.

डिझेलचे दर दिल्लीमध्ये १८ पैसे प्रति लिटरने वाढवण्यात आळे आहेत. ही कोणत्याही मेट्रो शहरांमध्ये तेल कंपन्यांनी केलेली डिझेलच्या दरातील सर्वाधिक वाढ आहे. दिल्लीत आता एक लिटर पेट्रोल ८०.९१ रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी ८७.९८ रुपये तर चेन्नईमध्ये ८५.९० आणि कोलकात्यामध्ये ८३.७८ रुपये मोजावे लागत आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुका व निकालांच्या रणधुमाळीच्या काळात सातत्यानं सुरू असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. मागील सलग १८ दिवस पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर होते. मात्र, दोन तारखेला लागलेल्या निवडणुकांच्या निकालांनंतर पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीचे सत्र पूर्वपदावर येताना दिसत असून १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर इंधनाच्या दरांमध्ये मंगळवारी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी इंधनाचे दर कमी करण्यात आले होते. दिल्लीत पेट्रोलचे दर लिटरमागे १६ पैशांनी तर डिझेलचे दर लिटरमागे १४ पैशांनी कमी करण्यात आलेले.

इंधनाचे दर हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती, परदेशी चलनाचे दर, कच्च्या तेलाची मागणी यासारख्या गोष्टांची सामवेश होतो. भारतात इंधनाचे दर रोज बदलले जातात. गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधानेच दर राज्याराज्यांमध्ये वेगळे आहेत. यामध्ये राज्यांकडून आकारल्या जाणारी कराची टक्केवारी वेगळी असल्याने हा दरांमधील फरक दिसून येतो.

इंधनाचे दर बदलण्यामागे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र संघांनी लॉकडाउन शिथिल करण्याचंही कारणं सांगितलं जात आहे. अधिक पर्यटकांनी पुन्हा एकदा देशामध्ये यावं यासाठी लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने तेलाची मागणी वाढल्याने दरही वाढल्याचे सांगितलं जात आहे.