07 March 2021

News Flash

पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये पुन्हा घट

काही अंशी का होईना पण दिलासा मिळतो आहे ही बाब निश्चित

प्रतिनिधिक छायाचित्र

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही दरांमध्ये पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल २० पैसे प्रति लिटर तर डिझेल ८ पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर ८५ रुपये ४ पैसे इतका असेल तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ३२ पैसे इतका असेल. दिल्लीतही पेट्रोल प्रति लिटर २० पैसे आणि डिझेल प्रति लिटर सात पैसे स्वस्त झालं आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७९ रुपये ५५ पैसे इतका असेल तर तर डिझेलचा दर प्रति लिटर ७३ रुपये ७८ पैसे इतका असेल. पेट्रोलच्या दरांनी नव्वदी गाठली होती, तर डिझेलचे दर ८० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दर काही प्रमाणात का होईना पण कमी होताना दिसत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली असताना हा काही अंशी का होईना दिलासा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 6:52 am

Web Title: petrol diesel prices in mumbai today are rs 85 04 per litre decrease by rs 0 20 rs 77 32 per litre decrease by rs 0 08
Next Stories
1 प्रदूषण, विषारी वायूमुळे २०१६ या वर्षात १ लाखापेक्षा जास्त मुलांचा मृत्यू-WHO
2 देशात अराजक, मोदी ‘चॉपस्टिक’ दांडिया खेळण्यात मग्न-शिवसेना
3 ‘निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण’
Just Now!
X