आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी प्रतिलिटर पेट्रोलचा दर १२ पैशांनी वाढवला आहे. दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर १२ पैशांनी तर चेन्नईमध्ये १३ पैशांनी वाढवला आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये मात्र काहीही बदल झालेला नाही.

मागच्या चार दिवसात दिल्लीमध्ये पेट्रोल ४६ पैशांनी महागले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर अनुक्रमे ७४.६६ पैसे, ७७.३४ पैसे, ८०.३२ पैसे आणि ७७.६२ पैसे आहे.

दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलच्या किंमती बदललेल्या नाहीत. मुंबईमध्ये प्रतिलिटर डिझेलचा दर ६८.९४ पैसे आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या, घटणाऱ्या दरांचा महागाईवर परिणाम होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलांचे दर वाढत चालले आहेत.