डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे खनिज तेलाची आयात तुलनेने स्वस्त झाला आह़े  परिणामत: पेट्रोलच्या किमतीत मंगळवारपासून ७० पैशांची घट झाली आह़े  पेट्रोलच्या किमतीतील गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घट आह़े
ही दरकपात मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आह़े  त्यात स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट आदीचा समावेश नाही़  त्यामुळे नेमकी दरकपात आणि त्यानंतरची पेट्रोलची किंमत प्रत्येक शहरात भिन्न असणार आह़े  दिल्लीत ८५ पैसे कपात होणार असून त्यानंतर पेट्रोलची किंमत ७१.४१ रुपये प्रतिलीटर असणार आह़े  तर मुंबईतील सध्याची ८०.८९ रुपये किंमत कमी होऊन बुधवारपासून पेट्रोल ८० रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आह़े