News Flash

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात

वाहनधारकांसाठी खुशखबर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.

| February 3, 2015 05:44 am

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात

वाहनधारकांसाठी खुशखबर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर २.४२ तर, डिझेलचे दर २.२५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून नवे लागू होणार आहेत.
याआधी मकरसंक्रातीच्या दुसऱयाच दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यात आली होती. महत्त्वाचीबाब म्हणजे, सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या १५ तारखेला किंवा महिनाअखेरीस या किमती जाहीर केल्या जातात. मात्र, यावेळी महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
पेट्रोल-डिझेल दरकपातीची आकस्मिकता तोटा देणारी..
मागील वेळेस दरात घट केल्यानंतर त्वरित अबकारी करात वाढ करण्यात आली होती. परंतु, यावेळी मात्र अद्याप असा निर्णय घेण्यात आलेला नाही. 

संबंधित बातम्या-
पेट्रोल, डिझेलपाठोपाठ युरियाही नियंत्रणमुक्त होणार
पेट्रोल-डिझेल स्वस्ताईचा लाभ कोणाला?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 5:44 am

Web Title: petrol price cut by rs 2 42 per litre diesel by rs 2 25 per litre
टॅग : Petrol Price
Next Stories
1 किरण बेदींचे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी?
2 मोदी सरकार २०१९पर्यंत राज्यसभेत अल्पमतातच राहणार
3 निवडणूकपूर्व सर्वेक्षणांत दिल्लीत ‘आप’ची मुसंडी, भाजप दुसऱ्या स्थानावर 
Just Now!
X