मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या धक्क्यानंतर आता पेट्रोलच्या दरात आज(सोमवार) प्रती लिटर १.६९ रुपयांची, तर डिझेलच्या दरात प्रती लिटर ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
रेल्वे भाडेवाढीच्या निर्णयानंतर देशभर केंद्र सरकार विरोधात निदर्शने झाली होती. तसेच सामान्यांना ‘बुरे दिन’ दाखविण्यास मोदी सरकारने सुरूवात केल्याची टीका विरोधकांकडून झाली होती. भारतीय जनता रेल्वे भाडेवाढीचा धक्का पचविण्याच्या प्रयत्नात असतानाच आता पेट्रोल आणि डिझेल वाढीच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशभर विरोधाचे सूर उमटण्याची शक्यता आहे.