News Flash

पेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग चौथ्या दिवशी वाढ, पाहा किती महागलं

चौथ्या दिवशीही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोल ३४ पैशांनी महागले असून प्रति लिटर ७८.७३ रूपये झाले आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून मुंबईत डिझेल प्रति लिटर ६९.५३ रूपये झाले आहे. राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरांत वाढ झाली आहे.

दिल्लीमध्ये शुक्रावारी पेट्रोल ३५ पैशांनी वाढून प्रति लिटर ७३.०६ रूपये झाले आहे. तर डिझेल २८ पैशांनी वाढून ६६.२९ रूपये झाले आहे. सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अनुक्रमे प्रति लिटर १४, २५ आणि २९ पैशांनी पेट्रोल महागलं होते. तर डिझेल प्रतिलिटर १५, २४ आणि १९ रूपयांनी महागलं होते.

(महाराष्ट्रतील विविध शहरांत असलेले शुक्रवारचे पेट्रोलचे दर)

इंडियन ऑयलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दर वधारून प्रति लिटर ७३.०६ रुपये, ७५.७७ रुपये, ७८.७३ रुपये आणि ७५.९३ रुपये झाले आहेत.  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..

(महाराष्ट्रतील विविध शहरांत असलेले शुक्रवारचे डिझेलचे दर )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 12:03 pm

Web Title: petrol price rise today petrol diesel prices likely to rise nck 90
Next Stories
1 ‘तुम्ही जितक्या खालच्या स्तरावर जाणार, तितकी उंच झेप आम्ही घेऊ’; भारताने टोचले पाकचे कान
2 अर्थमंत्र्यांचा उद्योगजगताला दिलासा; 1900 अंकांच्या उसळीनं शेअर बाजाराचं स्वागत
3 बलात्काराचा आरोप, माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना अटक
Just Now!
X