पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर रोज बदलत आहेत. देशाचा विचार केला तर महाराष्ट्र पेट्रोल दरवाढीत नंबर वन आहे असेच म्हणावे लागते आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ८० रूपये १० पैसे प्रति लिटर आहेत. तर सोलापुरात हेच दर ८० रूपये ७३ पैसे इतके आहेत. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता महाराष्ट्रातले हे दर देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज  निर्धारित करतात.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम निश्चितच महागाई वाढण्यात होतो. मुंबईत पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांनी ८० रूपये प्रती लिटरचा आकडा पार केला आहे. तर सोलापुरात दोन दिवस आधीच हे दर ८० रूपयांच्यावर गेले आहेत. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही प्रचंड दरवाढ झालेली दिसून येते आहे. या दरवाढीमुळे सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार हे अटळ आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे आजचे दर
शहर         पेट्रोल दर (प्रति लिटर )

मुंबई             ८० रूपये १० पैसे

सोलापूर        ८० रूपये ७३ पैसे

नागपूर          ८० रूपये १४ पैसे

नाशिक          ८० रूपये ०६ पैसे

कोल्हापूर       ८० रूपये ०३ पैसे

पुणे                ७९ रूपये ९२ पैसे

औरंगाबाद      ७८ रूपये ०९ पैसे

mypetrolprice.com या वेबसाइटने दिलेल्या या दरांवर नजर टाकली तर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर ८० रूपयांच्या वर गेले आहेत. सोलापुरात हे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे येत्या काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७२ रूपये २३ पैसे प्रती लिटर आहेत. तर चंदीगढमध्ये ६९ रूपये ४७ पैसे प्रति लिटर असे दर आहेत. जयपूरमध्ये ७५ रूपये १८ पैसे प्रति लिटर दर आहेत. तर अहमदाबादमध्ये ७१ रूपये ८३ पैसे प्रति लिटर पेट्रोलचे दर आहेत. देशातील शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय आहेत यावर नजर टाकली असता देशात सर्वाधिक दर हे महाराष्ट्रात आहेत असेच दिसून येते आहे. महाराष्ट्रातल्या पाच शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने प्रती लीटर ८० चा आकडा पार केला आहे.
२२ नोव्हेंबरनंतर आतापर्यंत पेट्रोलचे दर सातत्याने वाढतेच राहिले आहेत असेच दिसून येते आहे. पैशा-पैशाने मागील एकाच महिन्यात पेट्रोलचे दर तब्बल साडेतीन रुपयांनी वाढले आहेत.