पेट्रोलच्या दरात ४२ पैशांनी तर डिझेलच्या दरात १ रुपया ३ पैशांनी वाढ झाली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

दर पंधरा दिवसांनी जगातील इंधनाच्या दरावरुन देशातील कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो. सध्या जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने भारतीय कंपन्यांनीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. ‘जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे इंडियन ऑईल कॉर्पने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.