04 March 2021

News Flash

अखेर पेट्रोलने शंभरी गाठली; ‘या’ जिल्ह्याने गाठला उच्चांक

पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०० रुपये १३ पैशांवर

देशात एकीकडे सर्वसामान्य नागरिक लॉकडाउनमधून बाहेर पडत पुन्हा एकदा विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच नवी चिंता त्यांना सतावू लागली आहे. लॉकडाउनच्या काळात खासगी वाहनांचा वापर वाढत असतानाच इंधनाचे वाढते दर सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवत आहेत. त्यातच सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील अशी शक्यता आहे. राजस्थानमधील एका जिल्ह्याने तर हा उच्चांक गाठला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ; जाणून घ्या सध्याचे दर

राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेटानुसार, नॉन प्रीमिअम पेट्रोलची रिटेल किंमत प्रतिलीटर १०० रुपये १३ पैसे इतकी झाली आहे. देशभरातील पेट्रोल दरांमधील हा उच्चाकं आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर ९२ रुपये १३ पैसे इतका झाला आहे.

मुंबईत काय दर आहेत –
पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ९५ रुपये ४६ पैसे, तर मंगळवारी ९५ रुपये ७५ पैसे इतका होता. तर डिझेलचा दर ९० च्या जवळ पोहोचला आहे. डिझेलचा दर सध्या प्रतिलीटर ८६ रुपये ९८ पैशांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ८६ रुपये ३४ पैसे इतका होता.

दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत २५ पैशांनी वाढले आहेत. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. फक्त १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत.

२०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एकूण ५ रुपये ५८ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५ रुपये ८३ पैसे इतकी वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 10:30 am

Web Title: petrol rate crosses 100 rs in rajasthan gananagar district sgy 87
Next Stories
1 लाल किल्ला हिंसाचार : मुख्य आरोपीला दिल्लीत अटक; दोन तलवारी जप्त
2 “राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं”; ‘हम दो, हमारे दो’वरून रामदास आठवलेंचा सल्ला
3 मुस्लीम उद्योजकाने राम मंदिरासाठी दान केलेली रक्कम पाहून स्वयंसेवकांना आश्चर्याचा धक्का
Just Now!
X