19 September 2020

News Flash

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत यायला हवे; धर्मेंद्र प्रधान यांचा भाजपाला घरचा आहेर

या मुद्द्यावरुन कायमच मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याच मंत्र्याने याची किती आवश्यकता आहे, हे सांगण्याचे धारिष्ठ दाखवले आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणे आवश्यक आहे, असे केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली हे इंधनाच्या दरवाढीमागचे महत्वाचे कारण आहे. इंधन दरवाढीमुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत असल्याची मला जाणीव आहे. त्यामुळेच आता पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणायला पाहिजे, असे मत केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन कायमच मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याच मंत्र्याने याची किती आवश्यकता आहे हे सांगण्याचे धारिष्ठ दाखवले आहे.


प्रधान पुढे म्हणाले, इराण, व्हेनेझुएला यांसारख्या तेल उत्पादक देशांनी आम्ही उत्पादनात वाढ करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, जुलै-ऑगस्ट महिन्याच्या अहवालानुसार, या देशांनी तेल उत्पादनात वाढ केली नसल्याने त्याचा फटका भारतासाऱख्या तेल आयात करणाऱ्या देशांना बसला आहे. कारण, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने आंतराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

इंधनाच्या दरात सातत्याने वाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटरमागे ४८ पैसे आणि डिझेल प्रति लिटरमागे ५५ पैशांनी महागले. मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर ८७. ३९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलचे दर ७६. ५१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

गटांगळ्या खाणारा रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८७. ३९ रुपये आणि डिझेलचे प्रति लिटर ७६. ५१ रुपये इतके झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९. ९९ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिर ७२. ०७ रुपये इतके आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 10:07 pm

Web Title: petroldiesel should come under gst says union min d pradhan
Next Stories
1 हार्दिकचे बरेवाईट झाल्यास मोदी-शाहंना चहा-पकोडे विकायला भाग पाडू : राजू शेट्टी
2 एअर इंडियाने चुकीच्या धावपट्टीवर उतरवले विमान; १३६ प्रवाशी थोडक्यात बचावले
3 Apple iPhone XS : या रंगात येणार नवीन iPhone, फोटो लीक
Just Now!
X