News Flash

दिलासादायक बातमी… १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु

लहान मुलांवर लसीसंदर्भातील चाचण्या सुरु करण्याचा आम्हाला अभिमान असल्याचं कंपनीने म्हटलं आहे

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

करोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने गुरुवारपासून ११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचं स्पष्ट केलं आहे. “आमची सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने आम्ही फायझर-बायोएनटेक कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी बालकांना लस दिली आहे,” असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

लहान मुलांवर लसीसंदर्भातील चाचण्या सुरु करण्याचा आम्हाला अभिमान असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकजण करोनाची लस लहान मुलांना देण्यासंदर्भातील चाचण्यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. कंपनी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मिती करण्याच्या विचारात असून त्यासंदर्भातच चाचण्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीने याआधीच १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी करोनाप्रतिबंधक लसीची चाचणी सुरु केलीय. अमेरिकेमध्ये आपत्कालीन प्राधिकरणाने १६ वर्षे आणि त्यावरील व्यक्तींना लसीकरणाची परवानगी दिली आहे. फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेकाने लहान मुलांवरील लसींच्या चाचण्या करण्यास सुरुवात केलीय. तर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन सध्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीवर संशोधन करत आहे.

लहान मुलांना करोनाच्या संसर्गाची शक्यता वयस्कर व्यक्तींपेक्षा कमी असली तरी करोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. लहान मुलांना करोना संसर्गाचा अधिक त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच लहान मुलांसाठीही लस निर्माण करण्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. फायझरचे प्रवक्ते शेरॉन कॅस्टिलो यांनी २०२१ च्या दुसऱ्या सहामाईमध्ये मुलांवरील लसीच्या चाचण्यांसंदर्भातील निकाल समोर येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 11:03 am

Web Title: pfizer launches covid vaccine trial for kids under 12 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारतात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद; ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ
2 शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक; रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा
3 PM Modi Bangladesh Visit: पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर; उद्या प्राचीन मंदिराला देणार भेट
Just Now!
X