News Flash

नवकरोनावर फायझरची लस प्रभावी

‘नेचर मेडिसीन’ या नियतकालिकातील शोधनिबंधानुसार ही लस करोनाच्या ‘एन ५०१ वाय’ व ‘इ ४८४ के’ या दोन उत्परिवर्तनांवर गुणकारी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कोविड १९ च्या ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणूवर फायझर व बायोएनटेक यांची लस परिणामकारक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस नवकरोनावर प्रभावी नसल्याने त्या लशीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले लसीकरण दक्षिण आफ्रिकेमध्ये थांबवण्यात आले असतानाच ही आशादायी बाब समोर आली. ‘नेचर मेडिसीन’ या नियतकालिकातील शोधनिबंधानुसार ही लस करोनाच्या ‘एन ५०१ वाय’ व ‘इ ४८४ के’ या दोन उत्परिवर्तनांवर गुणकारी आहे. टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की,  दोन नवीन विषाणू प्रकारांत काटेरी प्रथिनातील अमिनो आम्लांची रचना बदलली असून त्यावर फायझरची लस मात करू शकते.

देशात २४ तासांत ९,११० जणांना लागण

देशात गेल्या २४ तासांत आणखी नऊ हजार ११० जणांना करोनाची लागण झाली, तर आणखी ७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिन्यात १० हजारांपेक्षा कमी जणांना करोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:27 am

Web Title: pfizer vaccine effective on new corona abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 थरूर, सरदेसाई यांच्या अटकेस स्थगिती
2 शेती कायदे रद्द करण्यासाठी खासगी विधेयक
3 चीनमधील प्रयोगशाळेतून करोना विषाणूच्या प्रसाराची शक्यता नाही
Just Now!
X