News Flash

फणीश मूर्तींविरुद्ध ‘ती’ महिला करणार कायदेशीर कारवाई

आयगेटमधून हकालपट्टी करण्यात आलेले कंपनीचे सीईओ फणीश मूर्ती यांच्यावर आता महिला सहकाऱयाचा लैंगिक छळ केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

| May 23, 2013 01:59 am

फणीश मूर्तींविरुद्ध ‘ती’ महिला करणार कायदेशीर कारवाई

आयगेटमधून हकालपट्टी करण्यात आलेले कंपनीचे सीईओ फणीश मूर्ती यांच्यावर आता महिला सहकाऱयाचा लैंगिक छळ केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
कंपनीच्या गुंतवणूकदार समन्वय विभागाच्या प्रमुख एरासेली रोइज यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांना गरोदर केल्याबद्दल मूर्ती यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कॅलिफोर्नियातील एमन-स्मिथ ऍंड मर्सी या कायदेविषयक कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही कंपनी रोइज यांच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करणार आहे.
मूर्ती यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रोइज यांनी दिल्यानंतरच त्यांनी आयगेटच्या व्यवस्थापनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. कंपनीतील महिला सहकाऱयाबरोबरचे संबंध लपवून ठेवल्याबद्दलच दोन दिवसांपूर्वी मूर्ती यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यापूर्वी २००२मध्येही इन्फोसिसमधून त्यांनी मूर्ती यांची महिलेची लैंगिक छळवणूक केल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 1:59 am

Web Title: phaneesh murthy to be sued for sexually harassing igate employee
Next Stories
1 सोनिया-मनमोहन सिंग यांच्यात मतभेद नाहीत
2 क्वाड्रिसायकल वाहनांना शहरांमध्ये परवानगी
3 पंतप्रधानांच्या मौनाने देशात निराशेचे मळभ; भाजपची टीका
Just Now!
X