News Flash

“PhD, Master’s सारख्या पदव्या महत्वाच्या नाहीत, आमच्या नेत्यांकडे…”; तालिबानच्या शिक्षणमंत्र्यांचं वक्तव्य

शेख मौलवी नुराल्लाह मुनीर यांच्याकडे तालिबान सरकारमधील शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

taliban education
तालिबानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरचं वक्तव्य (फोटो ट्विटरवरुन साभार)

तालिबान सरकारमधील शिक्षणमंत्री शेख मौलवी नुराल्लाह मुनीर यांनी पीएचडी आणि शिक्षणाच्या इतर पदव्या फारश्या महत्वाच्या नसल्याचं मत व्यक्त केलंय. मुल्लांकडे या पदव्या नसल्याचा संदर्भ देत या पदव्या म्हणजे सर्वात उच्च आहेत असं समजण्याचं कारण नाही असंही मुनीर यांनी म्हटलं आहे.

“पीएचडी आणि मास्टर्सची कोणतीही पदवी आज फारशी महत्वाची नाहीय. तुम्ही पाहू शकता की मुल्ला आणि सत्तेत असणाऱ्या तालिबानी नेत्यांकडे पीएचडी किंवा एमए किंवा अगदी शैक्षणिक शिक्षणही नाहीय पण ते आज येथील सर्वेसर्वा आहेत,” असं मुनीर यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या माघारीआधीच सत्ता काबीज केलेल्या तालिबानने अखेर मंगळवारी सरकारची स्थापना केली आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या  सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या माघारीआधीच सत्ता काबीज केलेल्या तालिबानने अखेर सरकारची स्थापना केली आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील.

नक्की वाचा >> दहशतवादी ते राष्ट्रप्रमुख… तालिबानने अफगाणची सत्ता ज्याच्या हाती दिली तो हसन अखुंद आहे तरी कोण?

दहशतवाद्याकडेच देशाच्या सुरक्षेची जबाबदारी

संयुक्त राष्ट्रांच्या यादीमध्ये दहशतवादी म्हणून समावेश असणाऱ्या सिराजउद्दीन हक्कानी हे अंतर्गत सुरक्षामंत्री असून मुल्ला याकूब यांना हंगामी संरक्षणमंत्री करण्यात आले आहे. अब्बास स्टॅनकझाई यांना नवीन अफगाण सरकारमध्ये हंगामी परराष्ट्र उपमंत्रिपद देण्यात आले आहे. तालिबानी प्रवक्त्याने म्हटले आहे की, नवीन अफगाण सरकारचे हंगामी पंतप्रधान म्हणूनही अखुंद यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर मुल्ला अब्दुल घनी बरादर यांना हंगामी उपपंतप्रधान करण्यात आले आहे. अहमदुल्ला वासिक यांनी सांगितले की, औपचारिक सत्ताग्रहण समारंभाआधी आम्ही नवीन सरकारमधील काहींची नावे जाहीर करीत आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळ पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल.

नक्की वाचा >> तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”

किती काळ काम हंगामी पद्धतीने काम करतील हे सांगता येत नाही
गेली वीस वर्षे अमेरिकेविरोधात लढलेल्या तालिबान्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तालिबानच्या गेल्या सरकारमधील अंतरिम पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद यांना तालिबान सरकारचे प्रमुख केले आहे तर अमेरिकेशी वाटाघाटीत सहभागी होऊन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात सहभागी असलेले मुल्ला अब्दुल गनी बरादर यांची उपपंतप्रधानपदी नेमणूक करण्यात आली आहे. तालिबान सरकारमध्ये सर्वाना प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाने केली असताना त्याची कुठलीही चिन्हे यात दिसलेली नाहीत. तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितले की, या नेमणुका अंतरिम आहेत. ते किती काळ काम हंगामी पद्धतीने काम करतील हे सांगता येत नाही. तालिबानने निवडणुका घेण्याचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.

नक्की वाचा >> तालिबानला युनायडेट नेशन्सकडून मोठा दिलासा

अखुंद आहे तरी कोण?

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा सध्या तालिबानकडून घेण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल अंतिम जबाबदारी असणाऱ्या रहाबारी शूरा या नेत्यांच्या परिषदेचे प्रमुख आहे. तालिबान जे निर्णय घेतं त्यामागे असणाऱ्या परिषदेला रहबारी शूरा असं म्हटलं जातं. त्याच परिषदेचे अखुंड हा प्रमुख नेता आहे. अखुंडचा जन्म कंदहारमध्ये झाला असून नंतर ते तालिबानच्या सशस्त्र लढाईचं नेतृत्व करणाऱ्या गटाच्या सहसंस्थापकांपैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 9:59 am

Web Title: phd master degrees not valuable mullahs greatest without them taliban education minister scsg 91
टॅग : Taliban
Next Stories
1 मेक्सिकोत ७.४ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा
2 Corona Update: रुग्णसंख्येत पुन्हा वाढ! देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ८७५ बाधितांची नोंद
3 ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी दिला धोक्याचा इशारा; म्हणाले, “इस्लामवाद हा जागतिक सुरक्षेला…”
Just Now!
X