अंटाक्र्टिकातील बर्फात व हिमात धूमकेतूच्या धुळीचे अस्तित्व आढळून आले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर धूमकेतूच्या धुळीचे अस्तित्व प्रथमच आढळून आले आहे. आतापर्यंत अवकाशात न जाता धूमकेतूची धूळ मिळवण्याचा केवळ स्ट्रॅटोस्फिअरमध्ये उंचीवर विमाने पाठवणे हा एकच उपाय होता. अनेक तास विशेष उपकरणे या उंचीवर ठेवल्यानंतर धूमकेतूची धूळ त्यात जमा होत असे. धुळीच्या या नमुन्यांवर नंतर अनेक प्रकारच्या चाचण्या व विश्लेषण केले जाते असे संशोधन निबंधाचे लेखक जॉन ब्रॅडले यांनी सांगितले. ते मनोआ येथे हवाई विद्यापीठात ग्रहशास्त्राचे संशोधक आहेत. अंटाक्र्टिका येथे धूमकेतूच्या धुळीचा मोठा साठा सापडला आहे, असे सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दोन ते चार एकक प्रमाणात ही धूळ सापडली असून त्याचा अवक्षेप करणे शक्य आहे असे ब्रॅडले यांनी सांगितले.
२०१० मध्ये फ्रेंच वैज्ञानिकांनी अंटाक्र्टिकातील हिमात कार्बन संपृक्त असे धूमकेतूतील धुळीचे कण बघितले होते पण यावेळी धूमकेतूची धूळ तेथे मोठय़ा प्रमाणावर आढळली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

असे आहेत धुलिकण..
अंटाक्र्टिकावर वेगवेगळ्या ठिकाणचे बर्फ व हिम आणून त्यातून ही धूळ गोळा करण्यात आली आहे. बर्फ व हिम वितळवून सुमारे तीन हजार सूक्ष्म उल्कापाषाण मिळवण्यात आले असून ते १० मायक्रॉन व्यासापासूनचे सूक्ष्म कण आहेत. सूक्ष्म उल्कापाषाणांचे निरीक्षण स्टिरिओमायक्रोस्कोपखाली पाच वर्षे करण्यात आले व  त्यात ४० कण धूमकेतूचे असल्याचे दिसून आले. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये सापडलेल्या धूमकेतूंच्या धुळीच्या कणांपेक्षा ते वेगळे आहेत. नासाच्या स्टारडस्ट मोहिमेत २००६ मध्ये धूमकेतूची धूळ जमा करण्यात आली आहे त्याच्याशी हे नमुने ताडून पाहण्यात आले.