News Flash

जर्मनीच्या मॅगझीनचा ‘तो’ दावा असत्य आणि निराधार; WHO चं स्पष्टीकरण

दोघांमध्ये झालेल्या चर्चेच्या वृत्तात कोणतीही सत्यता नाही.

जर्मनीच्या मॅगझीनचा ‘तो’ दावा असत्य आणि निराधार; WHO चं स्पष्टीकरण

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जर्मनीतील मॅगझीनने केलेला दावा फेटाळून लावला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम गेब्रेयसिस यांच्यात करोनाची माहिती उशिरा देण्याबद्दल झालेल्या चर्चेचं वृत्त असत्य आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दोघांमध्ये झालेल्या चर्चेच्या वृत्तात कोणतीही सत्यता नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात २१ जानेवारी रोजी कोणताही संवाद झाला नाही. करोना व्हायरसचा संसर्ग माणसांपासूनच माणसांना होत असल्याची पुष्टी २० जानेवरी रोजी करण्यात आली होती आणि २२ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं त्याची घोषणाही केली होती, असं स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलं आहे.

Next Stories
1 CBSE: तीन हजार केंद्रांवरुन दीड कोटी उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु; ५० दिवसांत पूर्ण होणार काम
2 अर्थमंत्री निर्मला सीतारामन PSU बँकांच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार, ‘हे’ आहे कारण
3 पश्चिम बंगालमधील मजूर निघाले पायी; रेल्वे परवानगीसाठी फडणवीसांची ममता बॅनर्जींकडे विनंती
Just Now!
X