News Flash

मतदारयादीत सनी लिओनी, हत्ती आणि कबूतर, सरकारी दरबारी भोंगळ कारभार

उत्तर प्रदेशात निवडणूक यादी अपडेट केली जात असून यावेळी सरकारी अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे

उत्तर प्रदेशात निवडणूक यादी अपडेट केली जात असून यावेळी सरकारी अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बल्लिया जिल्ह्याच्या मतदार यादीतील दोन पानं लीक झाली आहेत, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण या मतदारयादीत मतदारांच्या नावापुढे सनी लिओनी, कबूतर आणि हत्तीचा फोटो लावण्यात आला आहे. एका 51 वर्षीय महिलेच्या नावापुढे सनी लिओनीचा फोटो असून, 56 वर्षीय व्यक्तीपुढे हत्तीचा फोटो लावून अधिकाऱ्यांनी अकलेचे दिवाळे काढले आहेत.

उत्तर प्रदेशात 2019 लोकसभा निवडणुकीआधी मतदार याद्या अपडेट केल्या जात आहेत. मतदार याद्या अद्याप तपासल्या जात असून त्या सार्वजनिक करण्यात आलेल्या नाहीत. मात्र स्थानिक पत्रकारांच्या हाती ही दोन पानं लागली असून ती लीक झाली आहेत. या प्रकरणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.

‘ही एक आमच्या एका डेटा एंट्री ऑपरेटरकडून झाली आहे. नुकतीच त्याची बदली करण्यात आली आहे. आम्ही त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करत असून माहिती मिळवत आहोत’, असं बल्लिया जिल्हा प्रशासनातील अधिकारी मनोज कुमार सिंघल यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 5:35 am

Web Title: photo of sunny leone pigeon and elephan in up voter list
Next Stories
1 मुख्यमंत्री माझे भावोजी, पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ व्हायरल
2 ‘हे’ आहेत जगातले सर्वात धोकादायक जॉब
3 BMW आणि ऑडीने काढली एकमेकांची लायकी; ‘या’ फोटोमुळे पडली ठिणगी
Just Now!
X