12 August 2020

News Flash

गलवान खोऱ्यातील जवानांच्या शौर्यावर लडाखमधील कविनं रचलं गीत; पाहा व्हिडीओ

लडाखमधील कविने रचलं गीत

लडाख : गलवान खोऱ्यात शौर्य गाजवलेल्या जवानांच्याप्रती येथील कवी फुन्सुक लडाखी यांनी एक गीत रचले आहे.

गलवान खोऱ्यात शौर्य गाजवणाऱ्या आपल्या जवानांचा लडाखमधील एका कवीने आपल्या गीतातून गौरव केला आहे. त्याने अत्यंत चपखलपणे चिनी सैनिकांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या शौर्याचे कथन केले आहे. हे गाणं गातानाचा एक व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे.

फुन्सूक लडाखी असं या कविचं नाव असून त्यांनी आपल्या खड्या आवाजात गलवान खोऱ्यात शौर्य गाजवलेल्या जवानांवर रचलेलं गीत गाऊन दाखवलं आहे. “खाके, खाके हां खाके सौगंध मिट्टी की. पीके, पीके हां पीके पानी सिंध का. खाके सौगंध मिट्टी की, पीके पानी सिंध का शोला बनके बरसा, अरे शोला बनके बरसा” असे या गीताचे बोल आहेत.

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत भारतीय जवानांची झटापट झाली होती. यामध्ये २० भारतीय जवान शहीद तर अनेक जखमी झाले होते. याच जवानांच्या शौर्यावर फुन्सुक लडाखी यांनी हे गौरव गीत रचले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लडाखच्या निमू येथे भारतीय जवानांची भेट घेतली तसेच त्यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोदी म्हणाले, “जवानांचे साहस आणि भारतमातेप्रती समर्पण अद्वितीय आहे. भारताचे नागरिक शांततेत आपले जीवन जगू शकतात कारण त्यांना माहिती आहे की, आपले सशस्त्र जवान देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. आपल्या जवानांनी गलवानमध्ये जे धैर्य दाखवलं आहे त्यामुळे जगाला आपली ताकद समजली आहे”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 2:47 pm

Web Title: phunsuk ladakhi a poet recites his composition on the bravery of indian army personnel who fought in the galwan valley clash in ladakh aau 85
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रणांगणात उतरणार प्रसिद्ध गायक
2 लष्कराची मोठी कारवाई, काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
3 देशभरात करोनाबाधितांच्या संख्येने गाठला एका दिवसातील उच्चांक; २४ तासांत ६१३ मृत्यू
Just Now!
X