News Flash

पाकिस्तान एअरलाईन्सच्या भारतातील कार्यालयांना धमकी

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या मुंबई आणि दिल्लीस्थित कार्यालयांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या प्रवक्त्याने दिली.

| August 12, 2013 07:27 am

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या मुंबई आणि दिल्लीस्थित कार्यालयांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या प्रवक्त्याने दिली. दरम्यान, पाकिस्तान एअरलाईन्सच्या कार्यालयांना आवश्यक सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासन परराष्ट्र कार्यालयाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना दिले आहे.
हल्ल्याची धमकी आल्यानंतर भारत सरकारकडे पाकिस्तान एअरलाईन्सच्या मुबई आणि दिल्लीस्थित कार्यालयांना आवश्यक सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे, असे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले. दोन्ही देशांतील हवाई संपर्क तोडण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 7:27 am

Web Title: pia offices in delhi mumbai have received threats pakistan
Next Stories
1 मोफत वस्तूंचे आश्वासन हा आमचा विशेषाधिकार – राजकीय पक्ष
2 भारतीय जवानांच्या हत्येची पाकिस्तानने जबाबदारी स्वीकारावी
3 मनमोहन-शरीफ यांच्या चर्चेस भाजपचा विरोध
Just Now!
X