आगामी काळात वैमानिक केवळ त्यांच्या वैचारिक आदेशांन्वये विमान चालवू शकतील असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. टेनिशी युनिव्हर्सटिी, मुंचेन या विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे, की मेंदूच्या नियंत्रणाच्या मदतीने अतिशय अचूकतेने विमान चालवण्याची शक्यता दाखवून दिली आहे. या विद्यापीठाच्या फ्लाइट सिस्टीम डायनॅमिक्स या संस्थेचे प्रा. फ्लोरियन होल्झाफेल यांनी मेंदू नियंत्रित विमानउड्डाणाचा अभ्यास केला. युरोपीय समुदायाने ब्रेनफ्लाईट या प्रकल्पाला अर्थसाहाय्य दिले आहे.
जास्तीतजास्त लोकांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल असे एरोस्पेस अभियंता टिम फ्रीक यांनी सांगितले. मेंदूच्या नियंत्रणामुळे विमानाचे उड्डाण हा एक चांगला अनुभव असतो, त्यात एखादी व्यक्ती कॉकपीटचा प्रायोगिक अनुभव नसताना विमान चालवते. यात काही व्यक्तीची चाचणी घेतली असता त्या व्यक्तींनी दहा घटक जास्तीतजास्त अचूकतेने पूर्ण केले. त्यातील एक वैमानिक सेंटरलाइनच्या काही मीटर अंतरावर उतरले. नवीन नियंत्रणपद्धतीनुसार नियंत्रण यंत्रणा व उड्डाण गतिकीत काय बदल करता येतील याचा विचार चालू आहे. साधारणपणे वैमानिकाला स्टिअिरग हाताळणे जड जाते त्या समस्येवर यात मात करता येते. प्रतिसाद  हा मेंदू नियंत्रणाने विमान चालवण्याच्या प्रयोगात अजून साध्य झालेला नाही, त्यामुळे वैमानिकाच्या मेंदू संदेशाला मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा असतो.

माणूस व यंत्र यांच्यातील संदेशवहनात वैमानिकाच्या मेंदू लहरी कॅपला जोडलेल्या इलेक्ट्रोएनसेफलोग्राफीच्या मदतीने मोजता येतात. बíलन इन्स्टिटय़ूट अफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी अँड न्यूरोजिनॉमिक्सच्या वैज्ञानिकांनी त्याचा विद्युत संदेशांचे रूपांतर नियंत्रण संदेशात करण्याचा अलगॉरिथम शोधून काढला आहे. विमानाच्या नियंत्रणासाठी अतिशय स्पष्ट असे संदेश असावे लागतात व ते मेंदू संगणक यांच्या इंटरफेसला आकलन व्हावे लागतात.