17 December 2018

News Flash

‘बुलेट ट्रेन’चे रेल्वेमंत्र्यांकडून समर्थन

रेल्वे विकासात आधुनिकीकरण हा प्रमुख भाग आहे.

केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल

भारतात बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समर्थन केले असून तो विकास योजनांचा भाग असल्याचे म्हटले आहे. बुलेट ट्रेनची व्यवहार्यता व इतर मुद्दय़ांवरून या प्रकल्पावर टीका झाली होती.

‘कोरा’ या संकेतस्थळाने त्यांच्या वाचकांसाठी प्रश्न विचारण्याची व त्यावर ऑनलाइन समुदायाकडून उत्तरे मागवण्याची योजना सुरू केली आहे. त्यात भारताला खरोखर बुलेट ट्रेनची गरज आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे ८८४ शब्दांत समर्थन केले. त्यांनी यात काही ग्राफिक्स व पंतप्रधान हा मुद्दा पटवून देतानाची छायाचित्रे टाकली आहेत.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून त्यासाठी भारताच्या विकास योजनेत रेल्वे जाळ्याचे आधुनिकीकरण हा प्रमुख भाग आहे. त्याचबरोबर अतिवेगवान बुलेट ट्रेनही या विकास योजनेचाच भाग आहे. मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्प हा एनडीए सरकारच्या दूरदृष्टीच्या प्रकल्पांचा एक नमुना आहे. त्यातून सुरक्षा, वेग व सेवा यात लोकांना मोठी सुधारणा दिसून येईल शिवाय भारतीय रेल्वे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वेग व कौशल्ये यात आघाडीवर जाईल. कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच विरोध होत असतो. पण जसे बदल होत जातात तसा हा विरोध मावळतो. नवीन तंत्रज्ञानाला विरोध होतो हे इतिहासानेच सिद्ध केले आहे पण हे तंत्रज्ञान देशाच्या फायद्याचे असेल यात शंका नाही, असे गोयल यांनी सांगितले. बुलेट ट्रेन हा कमी खर्चाचा प्रकल्प आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल गोयल यांनी दिला असून त्यामुळे मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेला बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच विरोध होत असतो. १९६८ मध्ये राजधानी एक्स्प्रेस गाडय़ा सुरू करण्याचा विचार पुढे आला, तेव्हा त्याला रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांसह अनेकांनी विरोध केला होता. पण अशा विरोधामुळे भारत मागे पडू शकतो. आज राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्याची प्रत्येकाची इच्छा असते हे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला मोबाइल फोन तंत्रज्ञान स्वीकारण्यास भारताची तयारी नव्हती पण आज जवळपास प्रत्येक भारतीयाक डे मोबाइल आहे. भारत ही मोबाइल फोनची जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळेही प्रत्येक रेल्वे प्रवाशाला मिळणाऱ्या सेवेत क्रांतिकारी बदल होतील, यात शंका नाही.’  – पीयूष गोयल, रेल्वे मंत्री

 

First Published on November 15, 2017 2:31 am

Web Title: piyush goyal comment on high speed bullet train