06 August 2020

News Flash

कराचीत निवासी भागात विमान कोसळून ६० ठार

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी असलेले विमान शुक्रवारी कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी परिसरात कोसळून ६० जण ठार झाले आहेत.

लाहोरहून उड्डाण केलेले पीके-८३०३ हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले. यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन तेथील अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान रडारवरून अदृश्य होण्यापूर्वी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क साधून विमान उतरविण्यासाठी असलेल्या गिअरमध्ये समस्या असल्याची माहिती दिली होती. विमानाच्या अवशेषांखाली अडकलेल्यांना काढण्याचे काम अद्याप सुरू असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:18 am

Web Title: plane crash kills 60 in karachi abn 97
Next Stories
1 मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न हवेत – पवार
2 गणेश मूर्तिकारांना दिलासा
3 सिंगापूरमध्ये भारतीयांवर गुन्हा
Just Now!
X