07 August 2020

News Flash

‘बदनामीविषयक राहुल, स्वामींच्या याचिका घटनापीठाकडे सोपवा’

बदनामीच्या कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या राहुल गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी व अरविंद केजरीवाल यांच्या याचिका विचारार्थ घटनापीठापुढे पाठवण्यात यायला हव्यात

| July 9, 2015 12:03 pm

बदनामीच्या कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या राहुल गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी व अरविंद केजरीवाल यांच्या याचिका विचारार्थ घटनापीठापुढे पाठवण्यात यायला हव्यात, असे सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. आता या प्रकरणी सर्व याचिकांवर १४ जुलैस सुनावणी होणार आहे.
न्या. दीपक मिश्रा व प्रफुल्ला सी पंत यांच्या पीठाने केंद्राला या याचिकांवर प्रतिसाद देण्यास तीन दिवसांचा अवधी दिला आहे. याचिका मोठय़ा पीठाकडे पाठवण्याबाबत न्यायालयाने म्हटले आहे की, तसे करताना त्यातील योग्यायोग्यता तपासून पाहावी, कारण समलिंगी व्यक्तींच्या अधिकाराचा निकाल दोन न्यायाधीशांच्या पीठाने दिला होता. सोशल मीडियातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर तेच घडले होते; मग बदनामीच्या कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर घटनापीठाची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. महाधिवक्ता मुकुल रोहटगी व अतिरिक्त महाधिवक्ता पी.एस. नरसिंहा यांनी सांगितले की, या प्रकरणी घटनापीठापुढे सुनावणी आवश्यक आहे, कारण या तरतुदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम १९ (२) बाबत आहेत शिवाय भादंवि ४९९, ५०० या कलमांशी निगडित आहेत.
वरिष्ठ वकील टी.आर.अध्यार्जुना यांनी याप्रकरणी न्यायसहायक नेमण्याची मागणी केली व महाधिवक्तयांनी व्यक्त केलेल्या मतास दुजोरा दिला. अनेक देशात गुन्हेगारी बदनामी कायदा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे बदनामीला गुन्हेगारी कृत्य ठरवायचे नसेल तर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे,असे न्यायालयाने म्हटले   आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2015 12:03 pm

Web Title: pleas on defamation laws be sent to constitution bench says government
Next Stories
1 स्वच्छ भारत मोहीमेसाठी वर्षांत ९४ कोटींच्या जाहिराती
2 ‘एफटीआयआय’ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा?
3 बॉम्बच्या अफवेने ‘जेट एअरवेज’चे विमान उतरविले
Just Now!
X