भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका करत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावेळी निर्धमवादाचा ढोंग करणाऱयांपासून नागरिकांनी सावधान राहीले पाहिजे असे म्हटले. ते राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या वार्षिक बैठकीत बोलत होते.
पंतप्रधान म्हणाले की, देशात निधर्मवादावर घाला आणणाऱयांपासून जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्या निर्धमवादाला आपल्यानुसार परिभाषित करून निधर्मीवादाचे ढोंग करणारेही आहेत. त्यामुळे अशांपासून जनतेने सावध झाले पाहिजे. असेही ते म्हणाले. त्याचबरोबर अल्पसंख्यांकांसाठीच्या रोजगार आणि कल्याण योजनांवर काँग्रेस सरकार कोणत्यारितीने जास्त भर देऊ इच्छित असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाची शक्ती एकात्मतेत आहे त्यामुळे धार्मिक विघटन करणाऱया शक्तींपासून सावधान राहीले पाहिजे. त्यामुळे यापुढेही अशाच प्रकारे संघटीत राहण्याचे आणि देशाची एकात्मता टीकविण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.