News Flash

काल पंतप्रधान मोदींनी हेडलाइन दिली, पी. चिदंबरम यांची पॅकेजवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त ‘हेडलाइन असून कोरं पान आहे’ अशा शब्दात चिदंबरम यांनी टीका केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज या पॅकेजबद्दल विस्तृत माहिती देणार आहेत. त्यामुळे पॅकेजमधून कुठल्या क्षेत्राला किती लाभ होईल ते स्पष्ट होईल. “काल पंतप्रधानांनी हेडलाइन आणि कोरं पान दिलं. अर्थमंत्री ते कोरं पान कसं भरतात ते आज आम्ही पाहू. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून जे पैसे ओतले जाणार आहेत, त्यातल्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमचे बारीक लक्ष असेल. कोणाला काय मिळणार त्याचा सुद्धा आम्ही बारकाईने अभ्यास करु” असे चिदंबरम यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

वेगवेळया राज्यातून घराकडे निघालेल्या हजारो स्थलांतरित मजुरांबद्दल चिदंबरम म्हणाले की, गरीब आणि उद्धवस्त मजुरांनी शेकडो किलोमीटरची पायपीट केली, त्यांना या पॅकेजमधून काय मिळते त्यावरही आमचे लक्ष असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 10:43 am

Web Title: pm gave us a headline and a blank page p chidambaram dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दुर्दैव: मुंबई ते युपी…रिक्षातून केला १५०० किमी प्रवास; पण घरापासून २०० किमी अंतरावर असतानाच… 
2 “पाकिस्तान लष्कराला भारतावर हल्ला करण्याचे आदेश द्या”; PoK च्या मुख्य नेत्याची इम्रान सरकारकडे मागणी
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘महापॅकेजवर’ उद्योगजगत म्हणतं…
Just Now!
X