News Flash

पंतप्रधान ‘ब्लॅक मनी’ भारतात आणू शकले नाहीत पण ‘व्हाईट मनी’ विदेशात धाडत आहेत-काँग्रेस

नीरव मोदी प्रकरणावरून पंतप्रधानांवर काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत छायाचित्र )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाहीच पण आता पंतप्रधान देशातला पांढरा पैसा म्हणजेच लोकांच्या घामाची आणि कष्टाची कमाई विदेशात पाठवत आहेत अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. भाजपाने सोमवारी बँक घोटाळ्यांसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला होता. याच टीकेला उत्तर देत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा आरोप केला आहे.

नीरव मोदी पीएनबीत घोटाळा करून पळून गेला यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. तसेच कायम हे सांगितले जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील अनेक देशांचा दौरा करून आल्याने ते जगभरात लोकप्रिय आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या लोकप्रियतेचा उपयोग करून घोटाळेबाजांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत? भारतातील कर्जबुडवे परदेशात जाऊन आरामात राहतात. जनतेचा कष्टाचा आणि घामाचा पैसा अशा कर्जबुडव्यांच्या माध्यमातून विदेशात पाठवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असेही आझाद यांनी म्हटले आहे.

आजच भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत बँकांचे घोटाळे काँग्रेसच्या काळातले आहेत असा आरोप केला. तसेच राहुल गांधी आणि पी चिदंबरम यांनी ७ कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी खास प्रयत्न केले. त्यासाठी पी चिदंबरम यांनी पदाचा गैरवापर केला असेही प्रसाद यांनी म्हटले होते. या सगळ्या आरोपांना गुलाम नबी आझाद यांनी उत्तर दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 6:50 pm

Web Title: pm has not been able to bring any black money back to india but he is sending white money out of the country says gulam nabi azaad
Next Stories
1 ‘बोफोर्स घोटाळ्यात हात बरबटलेल्यांना आता राफेल करारावर संशय’
2 ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यंदाचे लाल किल्ल्यावरुन शेवटचे भाषण’
3 Loksatta Online Bulletin: ३२०० कोटींचा TDS घोटाळा, ऑस्करमध्ये ‘द शेप ऑफ वॉटर’चा दबदबा व अन्य बातम्या
Just Now!
X