Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’च्या अंतर्गत देशातील चार कोटी ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’ अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना ६२ हजार कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावात वाचण्यासाठी ४.९१ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रूपयांची मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

देशात १५ कोटी शेतकरी असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची मदत मिळणार आहे. आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नोंदणी झालेली नाही. या योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपयांची मदत मिळते. लॉकडाऊननंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजसंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. लॉकडाउन दरम्यान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

असं तपासा पैसे –

सर्व बँकाना सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास निर्देश देण्यात आले आहेत. खात्यावर पैसे पाठवल्यानंतर प्रत्येकाला मेसेज पाठवला जाईल. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक खात्याशी सलग्न करावा लागेल. किंवा पासबुक स्कॅन करावे. अथवा एटीएममधून मिनी स्टेटमेंट काढा.

यांना मिळणार नाही लाभ –
माजी किंवा सध्या संविधानीक पदावर कार्यरत असणारे, माजी किंवा सध्या मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा समावेश ते शेती करत असले तरी या योजनेत केला जात नाही. केंद्रात किंवा राज्य सरकारमध्ये अधिकारी त्याचप्रमाणे १० हजारांहून अधिक पेन्शन घेणारे कर्मचारी तसेच डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील, आर्किटेक्ट यापैकी कुणी शेती करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पैसे मिळाले नाही तर काय कराल?
जर तुम्हाला या पहिल्या आठवड्यात पैसे नाही मिळाले तर लेखापाल आणि कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करा. त्यातूनही तुमचं काम पूर्ण झाले नाही, तर केंद्रीय कृषि मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या टोल फ्री असणाऱ्या PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 या हेल्पलाइनवर संपर्क करा. त्याचप्रमाणे मंत्रालयाचा दुसरा नंबर 011-23381092 याठिकाणीही तुम्ही संपर्क करू शकता.