News Flash

वाजपेयी जयंती : ‘सदैव अटल’ स्मृतीस्थळी राष्ट्रपती, पंतप्रधानांचे अटलजींना अभिवादन

दरम्यान, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजनांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी अटलजींना अभिवादन केले.

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर जाऊन सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी अटलजींना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजनांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

वाजपेयींना अभिवादन करण्यासाठी जमलेल्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे वाजपेयींना अभिवादन केले. त्यांनी म्हटले, “देशवासियांच्या हृदयात स्थान असलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम.”

लखनऊमध्ये वाजपेयींच्या पुतळ्याचे पंतप्रधानांचे हस्ते अनावरण

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील प्रधानमंत्री लोक भवन येथे उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भव्य पुतळ्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 9:25 am

Web Title: pm modi and president kovind pay tribute to former pm atal bihari vajpayee on his birth anniversary aau 85
Next Stories
1 उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तर प्रदेशात एकाच दिवसात २८ जणांचा मृत्यू
2 Video: अटलजींच्या कविता, त्यांच्याच आवाजात…
3 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती: जाणून घ्या कोणते होते त्यांचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय
Just Now!
X