भारताचा अव्वल फिरकीपटू आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या हरभजन सिंगच्या विवाहाच्या स्वागत सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह भारतीय क्रिकेट संघातील सहकारी आणि बॉलीवूड तारेतारका उपस्थित होते.

फोटो गॅलरीः हरभजन-गीताच्या रिसेप्शनला क्रिकेटपटूंची मांदियाळी

गुरुवारी हरभजन सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा यांचा विवाह झाला. राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात रविवारी रंगलेल्या या सोहळ्याला अनिल कुंबळे, युवराज सिंग यांच्यासह मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली. रवीचंद्रन अश्विन, भारतीय संघसंचालक रवी शास्त्री उपस्थित होते.

हजाराहून अधिक व्यक्तींची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्याला नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, वीरेंद्र सेहवाग, प्रियांका चोप्रा उपस्थित आवर्जून उपस्थित होते.

हरभजन सिंग-गीता बसरा यांच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्याला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित होते.