02 March 2021

News Flash

अंदमान, निकोबारमधील तीन बेटांचे मोदींनी केले नामांतर

यावेळी केलेल्या भाषणांमध्ये घोषणांचा पाऊस

अंदमान निकोबारच्या दौºयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील तीन बेटाच्या नामांतराची घोषणा केली. रॉस बेट नेताजी सुभाषचंद्र बोस, नीलद्वीप शहीद द्वीप आणि हॅवलॉक बेट स्वराज्य द्वीप या नावाने ओळखले जाईल, असे मोदी यावेळी म्हणाले. या दौऱ्यात मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुरूंगातील कोठडीत ध्यानसाधना केली.

रविवारी अंदमान निकोबारमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीत प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते स्वातंत्र्यवीर सावकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या सेल्युलर जेलमधील त्या कोठडीलाही भेट दिली. यावेळी पोर्टब्लेअरमधील साऊथ पॉर्इंटवर पंतप्रधानांच्या हस्ते दीडशे फूट उंच उभारण्यात आलेल्या तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मोदी यांनी सभेलाही संबोधित केले. मोदी म्हणाले, जेव्हा देशासाठी वीरमरण पत्कलेल्या शहिदांची आठवण होते. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे गौरव आणि ऊर्जेने व्यापून टाकते.

आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान सुभाष बाबूंनी अंदमानच्या या भूमिलाच भारताच्या स्वातंत्र्याची संकल्प भूमी बनविले होते. आझाद हिंद सेनेने याच भूमित स्वातंत्र्याचा तिरंगा पहिल्यांदा फडकाविला होता, असे सांगत मोदींनी घोषणांचा वर्षाव केला. येणाऱ्या काळात अंदमान निकोबारमध्ये उच्च दर्जाची इंटरनेट सुविधा दिली जाईल. तसेच अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा यावेळी मोदी यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 9:52 pm

Web Title: pm modi at marina park in port blair andaman nicobar islands
Next Stories
1 ‘चौकीदार’च ‘दागदार’, काँग्रेसचा भाजपावर पलटवार
2 भांडणं झाली तर खून करून या, कुलगुरूंचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
3 नववर्षात सर्वसामान्यांना खूशखबर, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
Just Now!
X