पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना भावूक झाले. दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयावर बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. नोटाबंदीच्या निर्णयाला काळ्या पैशांविरोधातील सर्जिकल स्ट्राइक म्हणू नका, असे यावेळी मोदींनी म्हटले. नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या हिताचा असल्याचे प्रतिपादन यावेळी मोदींनी केले. याआधी गोव्याच्या सभेत बोलतानाही पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

‘नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला चाप बसणार आहे. मात्र काळ्या पैशाविरोधातील नोटाबंदीच्या कारवाईला सर्जिकल स्ट्राइक म्हणू नका’, असे आवाहन यावेळी मोदींनी केले. या बैठकीला भाजपचे खासदार उपस्थित होते. भाजपच्या अनेक खासदारांकडून नोटाबंदीच्या कारवाईचा उल्लेख सर्जिकल स्ट्राइक म्हणून केला जातो आहे. याबद्दल मोदींनी भाजपच्या खासदारांना असा उल्लेख न करण्याचे आवाहन केले.