बांगलादेश दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्यावतीने ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिब्रेशन वॉर अवॉर्ड’ स्वीकारला. १९७१ साली झालेल्या युद्धात वाजपेयींनी दिलेल्या सहकार्याबद्दल बांगलादेशने त्यांचा गौरव केला. वाजपेयींची प्रकृती ठीक नसल्याने मोदींनी वाजपेयींच्या वतीने पुरस्कार स्विकारला.
दरम्यान,  बांगलादेश दौऱयाच्या दुसऱया आणि शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदींनी सकाळी ढाकेश्वरी देवी मंदिराला भेट दिली.  ढाकेश्वरी मंदिरात पुजा केल्यानंतर मोदींनी ढाक्यातील रामकृष्ण मिशनलाही भेट दिली. मोदींना पाहण्यासाठी नागरिकांनी यावेळी तोबा गर्दी केली होती. यानंतर मोदी बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद यांची भेट घेतली. मोदींच्या मंदिर भेटीची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू होती. ट्विटवर ढाकेश्वरी मंदिराचा हॅश टॅक टॉप ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.
शनिवारी भारत-बांगलादेश दरम्यान गेली ४१ वर्षे सुरू असलेला जमीन सीमा वाद अखेर ऐतिहासिक करारानंतर संपुष्टात आला. या करारामुळे दोन्ही देश काही भूभाग एकमेकांना हस्तांतरित केला. त्याबाबतच्या कराराची कागदपत्रे दोन्ही देशांनी एकमेकांना दिली. या करारास संसदेने गेल्याच महिन्यात मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. बांगलेदासला दोन अब्ज डॉलरचे कर्जही भारतातर्फे मंजूर करण्यात आले.