News Flash

देशाचा मार्गदर्शक हरपला- नरेंद्र मोदी

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.

| July 27, 2015 10:57 am

पृथ्वी आणि अग्नी सारखे क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच देशातील पहिले स्वदेशी उपग्रह पीएसएलव्ही-३ विकसीत करण्यात कलाम यांचे महत्त्वाचे योगदान आहे. (एक्स्प्रेस फोटो)

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. कलाम यांच्या जाण्याने देशाचा मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी दिली. अब्दुल यांचे जाणे संपूर्ण देश आणि जगासाठी दु:खद वार्ता आहे. कलाम यांनी भारताला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचेजीवन, त्यांचे बोलणे आणि विचार देशासाठी दिशादर्शक होते, असे मोदी म्हणाले. तर कलाम यांच्या जाण्याने देशाचे कधीही भरुन न निघाणारे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटवर व्यक्त केली आहे.
दरम्यान,  ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री मेघालयच्या नोंग्रीम हिल्स येथील बेथानी रुग्णालयात निधन झाले. शिलाँगच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये(आयआयएम) व्याख्यान देत असताना अब्दुल कलाम अचानक व्यासपीठावर कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री पावणे आठच्या सुमारास कलाम यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराच्या धक्क्याने कलाम यांचे निधन झाल्याने रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 10:57 am

Web Title: pm modi condoles abdul kalam death
Next Stories
1 विज्ञानयोगी डॉ. अब्दुल कलाम यांचा अल्पपरिचय
2 ‘भाजपशी एकनिष्ठ पण पुढचे सांगणे कठीण’
3 …तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- राजनाथ सिंह
Just Now!
X