पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहतात. मग ते इंस्टाग्राम असो, लिंक्डइन असो, यूट्यूब किंवा ट्विटर असो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मावर पीएम मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहे. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सोमवारी पाच कोटी झाली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत मोदी 20व्या क्रमांकावर आहेत. पहिल्या २० मध्ये पोचणारे मोदी एकमेव भारतीय आहेत. अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोदी १.४ कोटी फॉलोअर्सने पिछाडीवर आहेत. अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा १०.८ कोटी फॉलर्अससह अव्वल स्थानावर आहेत.

२००९ मध्ये गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंट सुरू केले होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) अधिकृत ट्विटर अकाउंटची फॉलोअर्स संख्या तीन कोटी झाली आहे.

भारतात मोदींनंतर केजरीवाल दुसऱ्या स्थानावर –
भारतीय नेत्यांमध्ये मोदी यांच्यानंतर सर्वाधिक फॉलओअर्समध्ये दुसऱ्या स्थानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या स्थानावर आहेत. केजरीवाल यांचे ट्विटरवर एक कोटी ५४ लाख फॉलोअर्स आहेत. गृहमंत्री अमित शाह तिसऱ्या स्थानावर असून त्यांचे एक कोटी ५२ लाख फॉलोअर्स आहेत. राहुल गांधी या यादीत पाचव्या स्थानावर असून त्यांचे एक कोटी सहा लाख फॉलोअर्स आहेत. चौथ्या स्थानावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत. त्यांचे फॉलोअर्स एक कोटी ४१ लाख आहेत.