देशाची माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी श्रद्धांजली देण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाला भेट न दिल्याने काँग्रेस आणि शास्त्री कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, समाजमाध्यमांतही मोदींवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर उपस्थिती लावून पुष्पचक्र अर्पण केले पण त्यांनी लालबहादूर शास्त्रींच्या समाधीस्थळाला आज भेट दिली नाही.
गेल्या पन्नास वर्षांत प्रत्येक पंतप्रधानाने लालबहादूर शास्त्रींच्या जयंती दिनी शास्त्रींच्या समाधीस्थळाला भेट दिली आहे. पण मोदींनी आज शास्त्रींच्या समाधीस्थळाला भेट देणे टाळले. त्यामुळे ही अतिशय दु:खद गोष्ट असल्याची प्रतिक्रिया शास्त्री कुटुंबियांनी दिली. तर, नेटिझन्सनकडूनही फेसबुक आणि ट्विटरवर नाराजीच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
मात्र, पंतप्रधानांनी ट्विटरवर लालबहादूर शास्त्री यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शास्त्रींच्या समाधीसमोर नतमस्तक होत असल्याचे छायाचित्र मोदींच्या ट्विटर अकाऊंवटरून शेअर करण्यात आले आहे.