27 February 2021

News Flash

‘महाराष्ट्राची प्रगती व भरभराट होवो’, पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिनासोबतच गुजरातचा स्थापना दिवसही असल्याने पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेलाही गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनासोबतच गुजरातचा स्थापना दिवसही असल्याने पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेलाही गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे, असं ट्विट मराठी भाषेत मोदींनी केलं. तर गुजरातचे लोक हे नेहमी त्यांच्या साधेपणासाठी व व्यापारी कौशल्यासाठी ओळखले जातात. स्वातंत्र्य चळवळीत आणि देशाच्या वाटचालीत गुजरातने मोलाची कामगिरी बजावली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे भारताच्या विकासात हातभार लावावा असे ट्विटरद्वारे मोदींनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 9:23 am

Web Title: pm modi greets on the occasion maharashtra day
Next Stories
1 ‘राहुल गांधी नाटकी तर काँग्रेस ‘ड्रामा कंपनी’
2 दिवाळं निघालं तरीही नीरव मोदी म्हणतो, कर्मचा-यांना बोनस द्यायचाय!
3 जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड फय्याज कागजीच जेद्दाह स्फोटातील आत्मघातकी हल्लेखोर
Just Now!
X