11 December 2017

News Flash

पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचे निधन

कोलकाताच्या बेलूर मठात अंत्यसंस्कार होणार आहेत.

एक्स्प्रेस वृत्तसेवा, कोलकाता | Updated: June 19, 2017 2:14 PM

Swami Atmasthananda Maharaj : मोदी आत्मस्थानंद यांच्या शिकवणीतून प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्मस्थानंद यांना गुरु मानलं होतं.

पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचे रविवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. काल रात्री कोलकातामधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून स्वामीजींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी आणि स्वामी आत्मस्थानंद यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक ऋणानुबंध होते. १९६६ मध्ये स्वामी आत्मस्थानंद राजकोट येथील रामकृष्ण मठाचे प्रमुख म्हणून गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी मोदी स्वामी आत्मस्थानंद यांना पहिल्यांदा भेटले होते. पंतप्रधान मोदींनी वयाच्या २०व्या वर्षी स्वामी आत्मस्थानंद यांच्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी आत्मस्थानंद यांनी दीक्षा देण्यास नकार दिला, तसेच त्यांनी समाजसेवेचं व्रत अंगिकारण्याचा सल्ला दिला. मोदी आत्मस्थानंद यांच्या शिकवणीतून प्रभावित झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्मस्थानंद यांना गुरु मानलं होतं. हिमालयातून परतल्यानंतर मोदी काही काळ आत्मस्थानंद यांच्या सहवासात राहिले होते. स्वामी आत्मस्थानंद यांच्यावर आज कोलकाताच्या बेलूर मठात अंत्यसंस्कार होणार आहेत.

First Published on June 19, 2017 2:14 pm

Web Title: pm modi guru ramakrishna mission president swami atmasthananda passes away