भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करण्याच्या आरोपाखाली पकडले जात असल्याच्या मुद्दय़ावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांच्यासोबतच्या बोलण्यांमध्ये भर दिला असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
या दोन नेत्यांच्या शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या भेटीत मोदी यांनी भारतीय मच्छीमारांच्या मुद्दय़ावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा मुद्दा श्रीलंकेच्या अध्यक्षांपुढे मांडला, असे जावडेकर म्हणाले.
तामिळनाडूत अण्णाद्रमुक व द्रमुक यांच्या एकापाठोपाठ आलेल्या सरकारांचा कार्यकाळ भ्रष्टाचार व कुशासन यांनी गाजला. लोकांनी या दोन्ही भ्रष्ट पक्षांना निवडणुकीत धडा शिकवायला हवा, असे जावडेकर म्हणाले. लोकांना मोफत वस्तू नको असून चांगले शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.