पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) दीनदयाल उपाध्याय मार्गावरील पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी अमित शहा आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देत निश्चित कालावधीत कार्यालय उभारल्याने कौतुक केले. असे काम आर्थिक कारणांमुळे पूर्ण होत नाही. हे तेव्हाच होते जेव्हा तुमचे ते स्वप्न असेल आणि काम करण्याची जिद्द. तेव्हाच असे काम वेळेवर पूर्ण होते. यासाठी संघभावना असायला हवी आणि राष्‍ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेने हे काम अत्यंत खुबीने निभावली आहे. जनसंघ आणि भाजपाचे नेते स्वातंत्र्यानंतर सर्व प्रमुख जनआंदोलनात सर्वांत पुढे राहिले. आमचा पक्ष राष्‍ट्रभक्तीसाठी प्रतिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज, पीयूष गोयल, लालकृष्‍ण अडवाणींसमवेत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

तत्पूर्वी अमित शहा म्हणाले की, हा एक छोटा कार्यक्रम आहे पण भाजपासाठी खूप मोठा दिवस आहे. या मुख्यालयासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे कार्यालय असून प्रदेश कार्यकारिणी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होऊ शकते.

पक्षाचे नवे कार्यालय दीनदयाल उपाध्याय मार्गावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध पक्षांना आपले कार्यालय लुटियन झोन येथून इतरत्र हलवण्याचे निर्देश दिल्यानंतर असे पाऊल उचलणारा भाजपा हा पहिला राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.