पुढच्या महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अर्थतज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांबरोबर सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल चर्चा केली व त्यांची मते जाणून घेतली. निती आयोगाने ‘इकोनॉमिक पॉलिसी- द रोड अहेड’ या चर्चा सत्राचे आयोजन केले होते.

४० पेक्षा जास्त अर्थशास्त्री आणि अन्य जाणकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अर्थतज्ञांनी अर्थव्यवस्था, रोजगार, शेती, जलसिंचन, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर आपली मते मांडल्याचे पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेच्या विविध पैलुबद्दल अर्थतज्ञांनी जे सल्ले दिले. निरीक्षणे नोंदवली त्याबद्दल पंतप्रधांनी त्यांचे आभार मानले. केंद्रीय मंत्री पियुष गोयलही या चर्चासत्राला उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमन पाच जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे.