पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राफेल कराराच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर लोकसत्ता ऑनलाइनने हा प्रश्न लोकांना विचारण्याचे ठरवले. ज्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी मोदी भ्रष्टाचारी वाटत आहेत असे मत नोंदवले आहे. तर 49 टक्के लोकांनी मोदी भ्रष्टाचारी नाहीत असे मत नोंदवले आहे.

फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल साइट्सवर लोकसत्ता ऑनलाइनने पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट आहेत हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आरोप पटतो का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ट्विटरवर 2900 पेक्षा जास्त लोकांनी मत नोंदवले. ट्विटरवर 46 टक्के लोकांनी होय पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट वाटत आहेत असे मत नोंदवले तर 54 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट नाहीत असे मत नोंदवले. तर फेसबुकवर 2800 पेक्षा जास्त लोकांनी आपले मत नोंदवले. ज्यापैकी 50.4 टक्के लोकांनी होय पंतप्रधान भ्रष्ट आहेत असे वाटते असे म्हटले आहे तर 49.6 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट नाहीत असे मत नोंदवले आहे.