News Flash

PM Modi Bangladesh Visit: पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर; उद्या प्राचीन मंदिराला देणार भेट

करोना काळातील पहिलाच दौऱ्यासंदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती

फोटो सौजन्य: ट्विटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना झाले. जगभरामध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांनी मागील ४९७ दिवसांपासून एकही परदेश दौरा केला नव्हता. यापूर्वी मोदींनी नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझीलचा दौरा केला होता. मागील वर्षी मोदींनी जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या आणि महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. बांगलादेशने गुरुवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाय दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान नवी दिल्ली आणि ढाका दरम्यान किमान पाच सहमती करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुवर्ण जयंती समारंभामध्ये सहभागी होणार आहे. तसेच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यातही ते आज सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मार्चच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशाच्या प्रतिनिधिकांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी सामंजस्य करारांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण किमान पाच करारांवर स्वाक्षऱ्या होतील असा विश्वास व्यक्त केलाय.

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी या दौऱ्यासंदर्भात बोलताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण गहन चर्चा करणार आहे, असं म्हटलं होतं. मागील वर्षी सुरु झालेल्या करोनाच्या साथीनंतर आपला पहिलाचा परदेश दौरा हा मित्र राष्ट्रामध्ये असल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केलं आहे. करोनानंतरचा हा पहिलाच दौरा एका अशा मित्रराष्ट्रामध्ये आहे ज्याच्याशी भारताचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असं म्हणत मोदींनी या दौऱ्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचे संकेत दिलेत. शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य या भारताच्या धोरणामध्ये बांगलादेश महत्वाचा आहे, असंही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशमधील मंदिरांमध्येही जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. ५१ शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिरामध्ये देवी कालीची पुजा करण्यासाठी मोदी मंदिरात जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 9:35 am

Web Title: pm modi leaves for two day bangladesh visit scsg 91
Next Stories
1 “भारतात ३० टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील,” टीएमसी नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
2 ACB ने टाकला छापा; तहसीलदाराने स्वत:ला घरात कोंडून घेत २० लाखांच्या नोटा जाळल्या
3 भारतातून करोना लशीची निर्यात स्थगित
Just Now!
X