राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी जोर धरत असतानाच राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षातली पहिली मुलाखत दिली आहे. त्याच मुलाखतीत त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश काढला जाणार नाही असे म्हटले आहे.

राम मंदिराची मागणी जोर धरते आहे. शिवसेना असो भाजपा असो किंवा इतर पक्ष सगळ्यांनीच राम मंदिरासाठी अध्यादेश काढा अशी भूमिका घेतलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अध्यादेश काढला जाणार नाही असे म्हटले आहे. भाजपाच्याही अनेक नेत्यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढला जावा अशी मागणी केली आहे. तर विरोधकांनी राम मंदिर बांधण्याची या सरकारची इच्छाशक्तीच नाही असे म्हटले आहे.

नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या दौरा करत राम मंदिरासाठी आग्रही भूमिका घेतली. राम मंदिराच्या प्रश्नावर किंवा अध्यादेश काढण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप काहीही भूमिका मांडलेली नव्हती जी आज मांडत त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर अध्यादेश काढला जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्यानंतर अध्यादेशाबाबत विचार करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.