पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी चॅनलवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात दिसणार आहेत. पंतप्रधान मोदींवर चित्रीत करण्यात आलेल्या भागाचा सोमवारी ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीमध्ये नौका विहार करताना दिसतात. जीम कॉर्बेटच्या जंगलात हे चित्रीकरण करण्यात आले आहे. “मी निसर्गामध्ये राहिलो आहे. डोंगरात, जंगलांमध्ये वास्तव्य केले आहे. तो जो काळ होता त्याने माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकला. त्यामुळे निसर्गामध्ये चित्रीत होणाऱ्या या विशेष भागाबद्दल जेव्हा मला विचारण्यात आले. त्यावेळी माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि सहभागी होण्यासाठी मी तयार झालो” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
India- where you find lush green forests, diverse wildlife, beautiful mountains and mighty rivers.
Watching this programme will make you want to visit different parts of India and add to discourse of environmental conservation.
Thanks @BearGrylls for coming here! @DiscoveryIN https://t.co/AksPyHfo7X
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2019
“मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भारतातील संपन्न, समृद्ध पर्यावरण जगाला दाखवण्याची संधी मिळाली. बेअरसोबत पुन्हा एकदा जंगलात वेळ घालवण्याची संधी मिळाली. खरोखर तो एक खूप सुंदर अनुभव होता” असे मोदींनी सांगितले. मोदींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन का आवश्यक आहे? ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
डिस्कव्हरीवर मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या बेअर ग्रिल्सने या कार्यक्रमाचा ट्रेलर रिलीज केला. बेअर ग्रिल्सने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, महान टेनिसपटू रॉजर फेडरर, हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस आणि केट विन्सलेट यांच्यासोबत कार्यक्रम केले आहेत. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला त्याचदिवशी उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये या एपिसोडचे चित्रीकरण झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2019 4:43 pm